या जिह्यात भाजपात धूसफस : काँग्रेसमधून आयात उमेदवारास नागराध्यक्षची तिकिट

या जिह्यात भाजपात धूसफस : काँग्रेसमधून आयात उमेदवारास नागराध्यक्षची तिकिट

-अन्यथा बंडाचा झेंडा

प्रतिनिधी
चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षातून काही महिन्यापूर्वी भाजपात पक्षप्रवेश करणारे विलास विखार यांनाkनगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ते प्रचंड संतापले असून पक्षाच्या नेत्यांवर अधिकच नाराज झाले आहेत. विखार यांना उमेदवारी दिली तर बंडाचा झेंडा फडकणार अशी शक्यता आहे.

ब्रम्हपुरी नगर पालिकेत काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवक पदाचे १४ उमेदवार जाहीर केले आहे. तसेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुंबईत काँग्रेस निवड मंडळाची बैठक १२ नोव्हेंबर रोजी झाली. त्यात सर्वमान्य नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र भाजप मध्ये नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षातून भाजपावासी झालेले व एकेकाळी आमदार विजय वडेट्टीवार यांचे निष्ठावंत राहिलेले विलास विखार यांचे नाव पक्षाच्या नेत्यांनी समोर केल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

वर्षानुवर्षे पक्षासाठी कठोर परिश्रम करणारे, संघटना मजबूत करणारे आणि बूथ पातळीपासून ते मोर्चा आणि आंदोलन, चळवळींपर्यंत सहभागी झालेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी या निर्णयामुळे खूप नाराज आहेत. शहरातील मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख आणि विविध आधारस्तंभातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विलास विखार यांच्या संभाव्य उमेदवारीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.