माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ,अंधारेंची कुणावर शेलकी टीका ?

माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ,अंधारेंची कुणावर शेलकी टीका ?
-म्हणे, माझा भाऊ कमी पडलाय

प्रतिनिधी
नाशिक : “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय”, अशी फटकेबाजी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करीत राणे पिता पुत्रांची खिल्ली उडवली.

तसेच कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला असल्यामुळे ते आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार अंधारे यांनी केला. हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन कसं? अशी विचारणा करत सत्तेसाठी किती लाचारी, सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?, असं ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना डिवचलं होतं. याच ट्विटवर अंधारे यांना आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

संबंधित व्हिडीओ १० ते १५ वर्षांपूर्वीचा आहे. वादविवाद स्पर्धेचा तो व्हिडीओ असून समोरच्या म्हणण्याचं खंडन करण्याचा मी प्रयत्न करतीये. मात्र असा अर्धवट व्हिडीओ नीतू दाखवण्याचा प्रयत्न करतोय… मी समजू शकतेय की कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागलाय.. त्यांची कानशिलं लाल झालेली आहेत. अशा काळात त्यांचं अस्थिर होणं, नैराश्यात बोलणं मी समजू शकते”, अशी टोलेबाजी अंधारे यांनी केली.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय. पण हरकत नाही आपलेच भाचे आहेत, आपण समजून घेऊयात…”