माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची वायफड गावाला भेट सदैव स्मरणात

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची वायफड गावाला भेट सदैव स्मरणात

-अर्थजगताचे विद्यापीठ हरविले

प्रतिनिधी
नागपूर : विदर्भ दौऱ्यावर आलेले डॉ. सिंग यांनी वर्धा जिल्ह्यातील वायफड या छोट्याशा गावाला भेट दिली होती. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या निवासस्थानी त्यांनी गाव कऱ्यांशी संवाद साधला. या भेटीच्या आठवणींना जावंधिया यांनी उजाळा दिला. ते म्हणाले. “ देशाचे पंतप्रधान असलेले डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतमजुरांना मिळणाऱ्या अल्प मजुरीवर चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजावून घेतले. कापसाला भाव का मिळत नाही हे जाणून घेले आणि त्यावर आयात शुल्कात वाढ करण्याचे आश्वासन दिले. दिल्लीला गेल्यावर त्यांनी त्या दिशेने पावलेही उचलली. मनरेगासारखी योजना लागू करून शेतमजुरांना अधिक पैसे कसे मिळतील याची तजवीज केली. ऐवढेच नवहे तर त्यांनी एकाच वरषात शेतमालाच्या दरात तब्बल २८ ते ५० टक्के वाढ केली. कापसाच्या द रात तर दोन हजारावर ून तीन हजारापर्यंत प्रति क्वंटिलमध्ये वाढ केली होती. त्यांना राजकारण समजत नव्हते, ते अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या निधनाने गावपातळीवरील समस्यांचा विचार करणारा एक नेता हरपला, अशी प्रतिक्रिया जावंधिया यांनी दिली.

२००४-०५ काळात विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणे आणि शेतीसाठी घ्यावे लागणारे कर्ज यामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले होते. विशेषत: विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार तसेच केंद्रातीलही काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारवर उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढत चालला होता. त्याची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ३० जून व १ जलै २००६ असे दोन दिवस विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. तत्कालीन कृषी मंत्री शरद पवारही त्यांच्या समवेत होते. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील काही गावांना त्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या दैनावस्थेची पाहणी केली होती. १ जुलैला नागपूर येथे एतिहासिक ३,७५० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा१६०० वर गेला होता. सहा बाधित जिल्ह्यातील क्षेत्रांसाठी २००६-०७ साठी १,२७५ कोटी न!! अतिरिक्त कृषी कर्जाची घोषणाही त्यांनी केली होती. त्यासाठी नाबार्डकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती.  शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता.