मनोज जरांगे का मानतात एकट्या प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
-मात्र, अजित पवार कोसो दूर
प्रतिनिधी
बीड : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरु केला आहे. त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यापूर्वी ते राज्यात सर्वत्र सभा घेत आहेत. त्याचवेळी ओबीसी समाजाकडून सभा घेतल्या जात आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला. हा सल्ला आपणास शंभर टक्के मान्य आहे. परंतु अजित पवार यांचा सल्ला मान्य नाही. त्यांनी आपणास सल्ला देण्याऐवजी आपल्या माणसांना सल्ला द्यावा, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
– काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर ?
संविधान सभेत बोलताना शनिवारी मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की “जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक तारतम्य बाळगावे, जी चूक सोनिया गांधी यांनी केली होती. ती त्यांनी करु नये. सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन विरोधकांना संधी दिली होती. यामुळे मराठा आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असे कृपा करुन आणू नये. कारण आरक्षणासाठी ही मोठी लढाई आहे.


