मनसे धरणार भाजपाची साथ : मनसे नेते दिल्लीत दाखल

मनसे धरणार भाजपाची साथ : मनसे नेते दिल्लीत दाखल

-राज्यात राजकीय घडामोडीना वेग

प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीत नवीन पक्ष येणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे महायुतीत सहभागी होणार आहे. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे दिल्लीत पोहचले आहे. ते भाजप नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे २० मार्च रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नवीन संसदेचं रूपडं पालटणार आहे. जुन्या संसदेसमोरील महापुरूषांचे पुतळे नवीन संसदेसमोर बसवले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ११ प्राध्यापकांवर ४० पदांची जबाबदारी आहे. एका प्राध्यापकावर ५ पदांची जबाबदारी यामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.