पुढीलवर्षी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका !
-पंतप्रधान मोंदीचे पुढील 25 वर्षांचे व्हिजन
प्रतिनिधी
नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप झाला. ते म्हणाले, पुढील लोकसभा निवडणुकीला फक्त ४०० दिवस उरले आहेेत. प्रत्येक कार्यकर्त्याने एकेक मतदाराला भेटण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जावे. भारताचा सर्वोत्तम काळ समोर दिसत आहेे. देशाला तेथे पोहोचवण्यासाठी भाजपला राजकीय चळवळीऐवजी सामाजिक चळवळीच्या रूपात समोर यावे लागले.
पंतप्रधानांनी भाजपसाठी पुढील २५ वर्षांचे व्हिजनही मांडले. यात पक्षाला फक्त राजकीय न ठेवता सामाजिक उपक्रमाच्या रूपात बदलण्याचे आवाहन करण्यात आले. एक पक्ष म्हणून भाजपने जो पल्ला गाठला आहे, त्याची व्याप्ती वाढवून सामाजिक कामे करण्यापर्यंत न्यायचे आहे. मोदी म्हणाले, की नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बूथ मजबूत करा १८ तेे २५ वयाच्या तरुणामध्ये सुशासन काय असते, हे स्पष्ट करा. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पक्षाने एक महत्वाचा निर्णय घेेत अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला आहे. संरक्षणमंत्रीी राजनाथ सिंहयांनी हा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणी तोे स्वीकारल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत घोषणा केली. लालकृष्ण आडवाणी आणि अमित शाह यांच्यानंतर नड्डा असे तिसरे नेते आहेत तिसरे नेते आहेत, ज्यांना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद देण्यात आले आहे. राजनाथ सिंहही दोनवेळा पक्षाचे अध्यक्ष बनले, पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता.
‘बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ’च्या धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवले पाहिजे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले, की पंतप्रधांनांनी सांगितले आहे, सीमेलगतची गावे आणि जिल्ह्यांत पक्षने एक असा उपक्रम राबवला पाहिजे ज्यामुळे तेथे विकास होईल आणि लोकांचे जीवनमान उंचावेल. ज्याप्रमाणे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवण्यात आले त्याच धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवायला हवे. नैसर्गिक शेती असो की मग सौरऊर्जा किंवा अन्य एखादा उपक्रम. आज पृथ्वीला वाचवण्याची गरज आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जे.पी नड्डा हेच अध्यक्षपदी कायम अध्यक्ष जे. पी. नड्डांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला.
–नड्डांनी मान वाढविला : अमित शहा
गृहमंत्री शहा म्हणाले, नड्डांच्या नेतृत्वात पक्षाने १२० निवडणुका लढल्या, त्यापैकी ७३ मध्ये विजय मिळाला. पक्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि नड्डांच्या संघटनात्मक नेतृत्वात लढणार आहे. तिरंगा यात्रेद्वारेे भाजपने १.३० लाख बूथ मजबूत केले. उत्तर-पूर्वच्या अनेक राज्यांत सरकार स्थापन झाले. जमिनीवरील लोकांपर्यंत संघटना पोहोचवली. तेलंगणात भाजपसाठी चांगली वातावरणनिर्मिती केली.


