नागपुरात जेष्ठ संपादकाचे मोठे भाष्य : मागीलवर्षी या कारणामुळे १२० पत्रकारांचा मृत्यू

नागपुरात जेष्ठ संपादकाचे मोठे भाष्य : मागीलवर्षी या कारणामुळे १२० पत्रकारांचा मृत्यू

-महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांची माहिती

-WH वेब चॅनलतर्फे पत्रकारांचा सन्मान व मार्गदर्शन सोहळा थाटात

प्रतिनिधी
नागपूर : जगभरात मागीलवर्षी १२० पत्रकार मृत्युमुखी पडले. त्यातील ६८ टक्के पत्रकार गाझापट्टीत मरण पावले आहेत. रत्नागिरीतील पत्रकार रिफायनरीविरोधात लढताना मरण पावला. याची जर माहिती पत्रकारांना पुरेश्या प्रमाणात नसेल तर आपण कुठे तरी सामान्य माणसांपासून दूर जात आहे, असा अर्थ यातून निघतो आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी केले

प्रेस क्लबमध्ये डब्ल्यूएच न्यूज चॅनलच्या वतीने पत्रकारदिनानिमित्त समाजातील विविध व्यक्तींचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा शनिवारी(६ जानेवारी) आयोजित होता. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपराजित बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, उद्घाटक समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तर मार्गदर्शक म्हणून संपादक प्रकाश पोहरे, टीळक पत्रकार भवनचे व्यवस्थापक प्रभाकर दुपारे, डब्ल्यूएच न्यूजचे संपादक विजय खवसे, आएबीएम टीव्हीचे संपादक भीमराव लोणारे, सामाजिक कार्यकर्ता शाम मंडपे, पत्रकार संघपाल गडलिंग यांची उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले की, पत्रकारिता म्हणा किंवा जगापुढे एक ब्रह्मराक्षस येऊन ठेपला आहे़ जिथे पत्रकार पोहोचू शकत नाही. तिथे आपण काय-काय केले ते ठासून सांगण्याचे हे महाभंयकर अस्त्र आहे़ याचा धसका अनेकांनी घेतला आहे़ आभासी पद्धतीने खरे वाटले पाहिजे इतके खोटा बनाव तुमच्या मनावर टाकण्यात येणार आहे़ मेटावर्स व्हच्युर्अल व्हर्जनचेही संकट आहे. जे आपल्या मनात ते या भयानक पद्धतीने समोर येण्याचा हा काळ आहे, असे पत्रकारितेतील धोकेही त्यांनी उपस्थित पत्रकारांसमोर मांडले. पत्रकारितेच्या संवेदनशिलतेचे दाखले देत बत्थर समाजाला जागेवर आणण्यासाठी प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे़ सध्या एकमेकांना पाण्यात पाहण्याचे जग असताना तुम्ही पाण्यात पडलेल्यांना वाचविणाऱ्यांचा खरा सत्कार केला. यावरून संबंधित डब्ल्यूएच परिवाराचे अभिनंदनही निवासी संपादक अपराजित यांनी केले़

जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पत्रकारितेचे नवे आयुध समाजात मान्यताप्राप्त होत आहे. ही मोठी उपलब्धी आहे. अभ्यासू बाण्याचे पत्रकार डिजिटल माध्यमात येण्याची आवश्यकता सांगितली. उपायुक्त सिद्धार्थ
गायकवाड यांनी तंत्रज्ञानाने लोकांच्या हृदयात बसण्याची जागा कमी केल्याची खंत व्यक्त केली़ पत्रकारितेत एक विश्वास होता. आता काळ बदलला आहे. युग बदलले तसे माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. समाज घडवू व बिघडविण्याची ताकद तुमच्यात आहे. ही ताकद क्रियटिव्ह स्वरूपात वापरण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी केले़ संचालन शीतल खवसे यांनी केले. प्रास्ताविक विजय खवसे यांनी तर आभार भीमराव लोणारे यांनी मानले़ या कार्यक्रमाला वेब माध्यमांच्या पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

प्रदीप मैत्र यांचे महत्वापूर्ण भाष्य

यावेळी प्रदीप मैत्र म्हणाले की, आजही प्रिंट माध्यमांवर लोकांचा विश्वास आहे. राजकारणासाठी काही इथिक्स नाही. मग, पत्रकारितेसाठी कशाला हवे. पत्रकारितेतून सामाजिक विश्वासहर्ता टिकविणे गरजेचे आहे़ नवीन लोकांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे़ मात्र, अभ्यासाने परिपूर्ण पत्रकारच डिजिटल माध्यमांत यायला हवे़ त्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा महत्त्वाच्या ठरतात.