नागपुरात अजितदादांचा मुक्काम या नेत्याच्या शेजारी

नागपुरात अजितदादांचा मुक्काम या नेत्याच्या शेजारी

-फडणवीस यांना देवगिरी कायम

प्रतिनिधी
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागपुरातील मुक्काम अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानाशेजारी असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून नागपुरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला अजित पवार यांना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एकमत झाले. याबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचा माहिती आहे. PWD चा ३१/१ हा बंगला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण उपराजधानीत उपमुख्यमंत्र्यासाठी देवगिरी हा एकच बंगला आहे. सध्या देवगिरी हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलाय. त्यामुळे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमत झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस उपायुक्तांचा बंगला देण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू झाली आहे. तो बंगला तयार होईपर्यंत रवीभवन परिसरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. बंगला नंबर सहामध्ये अजित पवार यांचा तात्पुरता मुक्काम असेल. अजित पवार उपमुख्यमंत्री अशी नेमप्लेटही लागली आहे.