नागपुरातील या बड्या नेत्याने केली घराणेशाहीवर टीका
-नुकतीच दिली ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत
प्रतिनिधी
नागपूर : भाजपाकडून अनेकदा घराणेशाहीवरून काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांच्या मुलांना तिकीटं दिली आहेत. त्यानंतर आता काँग्रेसकडून भाजपाला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर परखड भाष्य केलं आहे.
नितीन गडकरी यांनी नुकताच ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान काही नेत्यांच्या मुलांना तिकीटे मिळवण्यासाठी भाजपाचा हा उत्तम पर्याय वाटतो. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, पक्षात काही समस्या आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात बोलताना, योग्यता नसताना नेते जेव्हा त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागतात, तेव्हा समस्या निर्माण होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


