नवनीत राणांची प्रकृती बिघडली : हे ठरले कारण, नागपुरातील या रुग्णालयात भरती
-पुढील २५ दिवस पूर्णत: बेडरेस्ट
प्रतिनिधी
नागपूर : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिला आहे.
भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पायाला झालेल्या गाठीमुळे नागपूरमधील नरेंद्रनगर येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या इजेचा त्रास पुन्हा उद्भवल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने येथे दाखल करण्यात आले. नागपुरातील सुप्रसिद्ध अस्थीरोग शल्यचिकित्सक डॉ. गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नवनीत राणा सध्या त्यांच्या रुग्णापायात उपचार घेत आहेत. पुढील २५ दिवस पूर्णत: बेडरेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.
नवनीत राणा यांच्या पायाला झालेली दुखापत ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात झालेल्या फ्रॅक्चरशी संबंधित असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात सतत प्रवास, सभा आणि जनसंपर्क मोहिमेमुळे ती इजा पूर्णत: बरी झाली नव्हती. आता त्याच ठिकाणी सूज आणि गाठ तयार झाली आहे. अमरावती येथील नामांकित ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना नागपूरमधील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


