देशमुख, फडणवीस यांच्या वादातील सांगलीतील तो स्पष्ट बोलला
-झेड प्लस सुरक्षा कशी काय ? भेदू शकतो
प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. या दोघांमध्ये यावरून कलगीतुरा रंगला असताना आता अनिल देशमुख यांनी समित कदम नावाची व्यक्ती फडणवीसांचा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, याबाबत आता स्वत: समित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
–…अखेर समित कदम बोलले
समित कदम यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांच्या आरोपावर भाष्य केलं. “अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तिथे मी त्यांच्या परवानगी शिवाय जाऊ शकत नव्हतो. मुळात त्यांनीच मला तिथे बोलवलं होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो”, असं समित कदम म्हणाले.


