का घेतला ? देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेचा समाचार

का घेतला ? देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेचा समाचार
-ठाकरेंना कलंकीचा काविळ

प्रतिनिधी
नागपूर : फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंना कलंकीचा काविळ झाला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून नागपुरातील सभेमध्ये त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती.

नागपुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात फडणवीसांचं राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही हे वक्तव्य ऐकवलं आणि टीकेची झोड उठवली. तर सिंहासन चित्रपटातील प्रदेशाध्यक्षाप्रमाणे बावनकुळेंची अवस्था झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी ‘कलंकीचा काविळ’असा उल्लेख केला आहे. तर कलंक या शब्दामुळे त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल करत अनेक घटनांची उजळणी देखील केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. स्वत: कलंकित असलो की कलंकित दिसायला लागतात असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. तर तुम्हाला कलंकीचा काविळ झाल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील ट्विट करत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हे कलंक नाही तर महाराष्ट्र भूषण आहेत. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की ‘उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही.’ भाजपकडून आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे या राजकीय वार पलटवारांनी नागपुरातील वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र सध्या आहे. तर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडत ठाकरेंचा निषेध देखील केला आहे.