कारण काय? या मंत्र्यांनी काढला, संजय राऊतांचा बाप

कारण काय? या मंत्र्यांनी काढला, संजय राऊतांचा बाप

-एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट शब्दांत टीका

प्रतिनिधी
मुंबई : शिवसनेच्या शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या मुद्यावरून थेट खासदार संजय राऊत यांचा बाप काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली नाही. पण ती संजय राऊत यांच्या वडिलांनी स्थापन केली का? असा तिखट सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून मनमानी चालणार नाही. शिवसेना शिंदेंच्या वडिलांनी स्थापना केली होती का? शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंची प्रमुखपदी निवड झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे. हा फूटलेला गट नाही. तो फुटलेला गट आहे, असे राऊत म्हणाले होते.
सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही कराल असे अजिबात चालणार नाही. गतवर्षी शिवाजी पार्कवर आमचा दसरा मेळावा झाला. यावेळीही आमचाच दसरा मेळावा तिथेच होईल, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली नाही. पण, ती संजय राऊतांच्या वडिलांनी म्हणजे राजाराम राऊत यांनी स्थापन केली का? असे ते म्हणाले.
दुसरीकडे, दादरमधील शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा शिवसेनेच्या कोणत्या गटाचा होणार? यावरून सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या दोन्ही गटांनी यासंबंधी महापालिकेकडे अर्ज केला आहे. यामुळे मैदान कोणत्या गटाला द्यायचे, यावरून प्रशासनाला मोठी माथापच्ची करावी लागणार आहे.