काय बोलता? आमदार मेघेंच्या संपत्तीत तब्बल १०२ कोटींनी वाढ
-जिल्ह्यातील कोट्यधीश आमदार
गजानन ढाकुलकर
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या नागपूर जिल्ह्यातील एका आमदाराच्या संपत्तीमध्येही तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे.
–समीर मेघे यांची संपत्तीची आकडेवारी
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये मेघे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता धरून संपत्ती १५९ कोटींची होती. त्यात वाढ होऊन २००४ मध्ये २६१ कोटी झाली आहे. समीर मेघे हे २०१४ मध्ये हिंगणा मतदारसंघातून भाजपच्या जागेवर निवडून आले. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजीकचे आहेत. तर माजी खासदार दत्ता मेघे यांचे ते पुत्र आहेत. समीर मेघे यांनी २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले होते. त्यानुसार त्यांच्या परिवाराकडे १५९ कोटी ५९ लाखांची संपत्ती होती. मेघे यांनी उत्पन्नाचे माध्यम व्यवसाय दाखवले आहे.


