काँग्रेसचे वेणूगोपाल मातोश्रीवर, हे ठरले राजकीय समीकरण
-देशाला हुकूमशाहीचा धोका
प्रतिनिधी
मुंबई : देशाला हुकूमशाहीचा धोका आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे असे काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस नेते वेणुगोपाल म्हणाले की, राज्यातील आणि देशातील राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने खंबीर उभे आहेत आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीसाठी प्रयत्न करत आहोत. सत्ताधारी विरोधकांना हुकुमशाही असल्याची जाणीव करून देत आहे. विरोधकांचे विचारधारा वेगळी असली तरी देशाला लोकशाही वाचविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्वांनी सोबत राहणे गरजेचे आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात “मी” समीकरणाविरोधात समीकरण सुरू आहे. भाजपचे देशात सत्ताभक्षक म्हणून ओळख होत आहे. ठाकरे जेव्हा मैत्री निभावतात तेव्हा एक नाते तयार करतात, हे भाजपला समजले नाही. शिवसेनेत त्यांनी गद्दारी घडवून आणली आता लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.


