कमळ धुळीस; कर्नाटकी जनतेचा पंजाला हात
-११४ जागी विजय, भाजप ७३ जागेवर
प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस 114 जागांवर, भाजप 73 जागांवर, जेडीएस 30 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत.
वृत्तवाहिन्यांच्या कलानुसार काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 30 आणि इतरांना 6 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या सर्व मतदारांना बंगळुरूला पोहोण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, भाजप किंवा काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगावमधून, तर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा जागेवरून आघाडीवर आहेत. जेडीएस नेते कुमारस्वामी चन्नापटना जागेवर आघाडीवर आहेत. सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र म्हणाला की, माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास म्हणाले, “जय बजरंगबली, तोड दी भ्रष्टाचार की नली.”


