उद्धव सेनेच्या या बड्या नेत्याने काँग्रेसचा काढला वचपा… म्हणाले…!

उद्धव सेनेच्या या बड्या नेत्याने काँग्रेसचा काढला वचपा… म्हणाले…!

-हरियाणातील काँग्रेसचा पराभव दुर्देवी

प्रतिनिधी
मुंबई : जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. काश्मीर देशाच्या, भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाच राज्य आहे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये, देशामध्ये क्रांती होईल हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग होता. राम मंदिर बनवलं आणि कलम 370 हटवून त्याचा प्रचार करुन मोदी आणि त्यांच्या पक्षाचा काश्मीरमध्ये पराभव झाला हे लक्षात घ्या” असं संजय राऊत म्हणाले. ‘एक राज्य इंडिया आघाडीने आणि एक राज्य भाजपाने जिंकलं’ असं संजय राऊत म्हणाले. “हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकली. हरियाणात इंडिया आघाडी झाली असती, सपा, आप, एखादी जागा शिवसेना, एनसीपीला मिळाली असती, तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता” असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते, तिथे ते प्रादेशिक पक्षाची मदत घेतात. हे भाजपाचच धोरण आहे. जिथे काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्ष, इतरांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालात दिसतो” असं संजय राऊत म्हणाले. “हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेच यश हे इंडिया आघाडीच यश आहे” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.