आजपासून निवडणूक आचारसंहिता : आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रपरिषद
-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होणार
प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मतदार यादीचा कार्यक्रम अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचे घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ( 4 नोव्हेंबर)सायंकाळी चार वाजता त्याविषयीच्या अधिकृत पत्रकार परिषद होत आहे. यानिमित्ताने निवडणुकीच्या आचारसंहितेला सुरुवात होईल.
मुंबई येथील जुने सचिवालय जिमखाना परिसरात राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेचे आयोजन आहे. सर्व प्रसारमाध्यमांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यभरातील नगरपरिषदा. नगरपंचायती 32 जिल्हा परिषदा 29 महानगरपालिकेच्या निवडणुका यानिमित्ताने होत आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सलग जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुहूर्त राहील, असा आहे. या सर्व निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी आयोगाला घ्यायचे आहे. 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 29 महानगरपालिका आणि 331 पंचायत समितीच्या निवडणुका यानिमित्ताने होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या इच्छेला या निमित्ताने पूर्णविराम मिळणार आहे.
दुसरीकडे राज्यभरातील विरोधकांनी मतदार यादी दुरुस्ती न करता या निवडणुका घेतल्याने विरोधकांनी या निवडणूक कार्यक्रमावर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात विरोधकांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून या निवडणुकापूर्वी मतदार यादीचे पुनर्विलोकन किंवा त्या याद्या दुरुस्त करूनच निवडणुका घ्याव्या, असा आग्रह धरला आहे. त्या संदर्भात एक निवेदनही विरोधकांचे शिष्टमंडळ देईल, अशी माहिती सूत्रांची आहे.


