अत्यंत धक्कादायक: महाराष्ट्र भूषण’ने घेतले १० बळी, ३०० जण भरती

अत्यंत धक्कादायक: महाराष्ट्र भूषण’ने घेतले १० बळी, ३०० जण भरती

– सभेत उन्हामुळे उष्माघाताचा त्रास
-मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली स्वतः माहिती

प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे काहींना चक्कर आली असून जवळपास 300 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यामध्ये अनेक जण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळ या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय, अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे यांनी केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा जंगी सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी खारघर येथील मैदानावर अप्पासाहेबांच्या 5 लाखांहून अधिक श्रीसदस्यांनी हजेरी लावली आहे. ते शुक्रवारपासूनच शिस्तीने नवी मुंबईकडे निघाले होते.
आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. अप्पासाहेब व त्यांचे पिता नानासाहेबांचे देशभरात लाखो अनुयायी आहेत. कोकण, मुंबईत ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी बहुतांश लोक ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे होते. या सोहळ्याच्या माध्यमातून ही ‘व्होट बँक’ आकर्षित करण्याचे शिंदे व भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातून हजारो श्रीसदस्य सोहळ्यासाठी आले आहेत. अमित शहांसारख्या बड्या नेत्याकडून अप्पासाहेबांचा गौरव करुन या अनुयायांचीही मने जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा होती.