आज बिहारमध्ये १२१ जागांवर मतदानाला सुरुवात : मोदींनी हे केले आवाहन
-१४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार
प्रतिनिधी
बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, दरभंगा, सारण, सिवान, गोपालगंज, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या प्रमुख १२१ जागांवर मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहार सरकारच्या १४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री विजय कुमार सिन्हा हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, मतदानाचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स लिहिले की, “आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. विधानसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील सर्व मतदारांना मी उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने, राज्यातील माझ्या सर्व तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. लक्षात ठेवा: आधी मतदान करा आणि नंतर नाश्ता.”
https://x.com/narendramodi/status/1986240868463026416?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1986240868463026416%7Ctwgr%5E454a6ed1311684a909e19baeee09c597e43d19c7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fbihar-assembly-election-2025-first-phase-voting-121-constituencies-lop-tejashwi-yadav-dcm-samrat-choudhary-cm-nitish-kumar-rjd-jdu-bjp-congress-prashant-kishore-aam-93-5489303%2F
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमदवार तेजस्वी यादव यांनीही मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “लोकशाही, संविधान आणि मानवतेसाठी मतदान महत्त्वाचे आहे.”
–आम्हाला मतदान करू दिले नाही
दोन महिलांनी दावा केला आहे की, त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करू दिले नाही. श्रेया मेहता नावाच्या एका महिलेने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “मतदान अधिकाऱ्याने आम्हाला स्लिप दिली नाही. ती डिजिटल पद्धतीने डाउनलोड करण्यास सांगितले. माझे नाव मतदार यादीत आहे. आता मला स्लिप आणण्यास सांगितले जात आहे, अन्यथा मला मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. माझ्याकडे माझे मतदार ओळखपत्र देखील आहे. माझे नाव यादीत आहे. आम्ही सकाळी ६:३० वाजल्यापासून येथे वाट पाहत आहोत. आता आम्ही परत जात आहोत, आम्ही मतदान करणार नाही.”


