या खासदाराने लग्नाचे आमिष दाखविले, लैंगिक शोषणही केले
-महिलेची राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएचडी स्कॉलर महिलेच्या तक्रारीनंतर सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने आपल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. लवकरच सत्य समोर येईल. मी माझ्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन. मी मागे हटणार नाही,” असे तिने लिहिले आहे.
भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएचडी स्कॉलर महिलेच्या तक्रारीनंतर सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने आपल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. लवकरच सत्य समोर येईल. मी माझ्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन. मी मागे हटणार नाही,” असे तिने लिहिले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? महिलेने तक्रार दाखल करताना नक्की काय म्हटले आहे? कोण आहे चंद्रशेखर आझाद? जाणून घेऊयात.
– असे आहे प्रकरण
तक्रारदार महिला ही इंदूरमधील बिमा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कामगाराची मुलगी आहे.
ती २०१९ मध्ये उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती.
तिने सांगितले की, शिक्षण सुरू असतानाच ती चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आली आणि ते दोघे तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.
तिने आपल्या तक्रारीत म्हटले, “२०२१ पासून आम्ही संपर्कात होतो. या काळात चंद्रशेखर यांनी मला आश्वासन दिले की ते अविवाहित आहेत आणि लग्नासाठी माझ्यासारख्याच व्यक्तीच्या शोधात आहेत. त्यांनी मला लग्नाचे आश्वासन देऊन माझ्याशी भावनिक संबंध निर्माण केले. त्यांच्या आश्वासनानंतर मी त्यांना पूर्णपणे स्वीकारले आणि त्यांच्या राजकीय प्रचारातदेखील त्यांना पाठिंबा दिला.”