थेट चॅलेंज! २०२६ मध्ये या राज्यात होणार भाजपाचा मुख्यमंत्री
-केंद्रीय गृहमंत्र्यांचे मोठे विधान
प्रतिनिधी
नवी दिल्ली : रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे मिशन २०२६चे रणशिंग फुंकले. बंगालच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल सरकारला धारेवर धरले. सभेच्या सुरूवातीला अमित शाह यांनी बंगाल आणि देशासाठी आदरणीय अशा स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांना नमन केले. सभेच्या सुरूवातीलाच अमित शाहांनी म्हटले की, “बंगालमध्ये भाजपाचं सरकार येणार आणि घुसखोरी बंद होईल.” असे सांगताना त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणाही दिल्या.
अमित शाह यांनी भाषणात म्हटले की, “राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण, घोटाळे आणि राजनैतिक हिंसा आता टोकाला पोहोचली आहे. एसएससी घोटाळा असो वा रेशन घोटाळा, बंगाल सरकार तरूणांचे हक्क हिरावून सत्तेची मलई खात आहे.” यावेळी बोलताना शाह यांनी असा दावा केला आहे की, २०२६मध्ये टीएमसीची पाठवणी होणारच आणि भाजपाचं सरकार येणारच आहे. लक्षात ठेवा की, २०२६ मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री शपथ घेतील.


