पुन्हा विधान चर्चेत : अन्यथा मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल

  • पुन्हा विधान चर्चेत : अन्यथा मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल

-मलाही मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर होती

प्रतिनिधी
नवी दिल्ली : धनंजय मुंडेना यांना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन’, असे विधान काही दिवसांपूर्वी मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांनी केले आहे.

काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असेही ते म्हणाले. कॅबिनेट मंत्रीछगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजीनाम्याबद्दल विधान केले. भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, “उद्या जर धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं, तर माझी काहीही हरकत नाही.”

“मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय. मला सन्मानाने परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले. त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली, तर मी राजीनामा देईन”, असे विधान छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

मंत्रिपद देताना या गोष्टीची चर्चा झाली होती का? असा प्रश्नही छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. भुजबळ म्हणाले, “अशा पद्धतीची चर्चा होवो अथवा न होवो; राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार.”

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा भुजबळांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल, असे समजले जात होते. पण, त्यांना संधी दिली गेली नाही. नाशिकमधून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ मंत्री बनले होते.