देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांना हा दिला सल्ला, म्हणाले लक्षात ठेवा…
-भाजप नेत्यांचे विचारमंथन
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडूनही कंबर कसली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी (दि.१२) भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. याशिवाय, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा. अधिकाधिक वेळ आपापल्या मतदारसंघात द्या. मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना देत लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिले.


