आता भाजपाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर : काँग्रेसच्या १५ प्रवक्त्यांची फौज
-भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता प्रवक्त्यांची भलीमोठी यादी तयार केली असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने नेते व प्रवक्त्यांची १५ जणांची फौज तयार केली आहे. परिणामी भाजप आणि काँग्रेसमध्ये आता वाकयुद्ध बघायला मिळणार आहे.
सत्ताधारी पक्षाकडून खोटे कथानक तयार करून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. भाजपचा माहिती तंत्रज्ञान विभाग विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, चित्रफिती खाडाखोड करून किंवा त्यात बदल करून समाज माध्यमांमधून प्रसारित करीत आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी १५ नेत्यांकडे जबाबदारी सोपविल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
-यांच्या खांद्यावर जबाबदारी


