हे कारण; पुण्यात ऐन मतदानाच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी

हे कारण; पुण्यात ऐन मतदानाच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी

-पक्ष नेत्यांना घ्यावी लागली दखल

प्रतिनिधी
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस निर्माण झाली असतानाच पुणे महापालिकेतील भाजपचे मात्र मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ माजी नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपची त्यांना थोपविण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मतदानाला थोडा अवधी राहिला असताना या नगरसेवकांच्या वेगळ्या भूमिकेची दखल भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांना घ्यावी लागली असून, मतदानाच्या दिवशी दगाफटका झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना विचार केला जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे. या नगरसेवकांच्या पवित्र्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून, मतदान होईपर्यंत त्यांना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.