या नेत्याचे पुन्हा संविधान बदलाचे वक्तव्य, स्वपक्षाची कोंडी

या नेत्याचे पुन्हा संविधान बदलाचे वक्तव्य, स्वपक्षाची कोंडी

-म्हणाले, घटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश जागांची गरज

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश :  भाजप राज्य घटनेत बदल करणार असल्याचा आरोप अनेकदा इंडिया आघाडीकडून करण्यात येतो. तर भाजप नेहमी आरोप फेटाळण्यात येतो. पण उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या एका वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार तर 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते. पण देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचे वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केले आहे. ते फैजाबाद या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहे. तर विद्यमान खासदार पण आहेत. समाजवादी पक्षासह काँग्रेसने आता भाजपला या मुद्दावर घेरले आहे.

लल्लू सिंह यांचा यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ” राज्यघटनेत सुधारणा करावी लागणार आहे. अनेक काम करायची आहेत. सरकार तर 272 जागांवर येते, पण केवळ 272 खासदारांच्या जीवावर राज्य घटनेत सुधारणा होऊ शकत नाही. नवीन राज्य घटना तयार करण्यासाठी दोन तृतीयांशापेक्षा अधिक बहुमत लागते, अधिक जागा लागतात.”, असे वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केले आहे.