राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य; विदर्भातील या नेत्याचा संताप

राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य; विदर्भातील या नेत्याचा संताप

-बेताल वक्तव्य मात्र कारवाई नसल्याची खंत

प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या विषयी संजय गायकवाडने तीन दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य केले आहे. मात्र त्याला अटक झालेली नाही म्हणूनच अनिल बोंडेची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार, अशी भाषा करतात तरी राज्यातील – देशातील पोलीस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलिस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार? असा परखड सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे

वडेट्टीवार आपल्या ट्विट संदेशात म्हणतात, संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे.महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही.एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत.

राहुलजी गांधींनी घेतलेली
संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे.