या पक्षांचा वाढला ‘बीपी’ : आमदाराचा भाजपा प्रवेश

या पक्षांचा वाढला ‘बीपी’ : आमदाराचा भाजपा प्रवेश

-पुणे ग्रामीणमध्ये भाजपा भक्कम

प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एनडीएचे सरकार असले तरीही सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्षांमध्ये वेळोवेळी तणाव निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा रंगली होती. जगताप यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षांतरानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी चिंताग्रस्त असल्याचे दिसते.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संजय जगताप यांच्या पक्षबदलामुळे पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसू शकतोत, कारण त्यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे पुणे ग्रामीणमध्ये भाजपाला त्यांचा पाया आणखी मजबूत करता येईल. याआधी या भागात भाजपाची पकड मजबूत मानली जात होती.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुणे हा बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. मात्र, शरद पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर या भागातील त्यांची पकड कमकुवत झाली. असं असताना पुण्यात काँग्रेसचा प्रभाव अजूनही जाणवतो. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. पुण्यात काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही, तर २०१९ मध्ये पुण्यात काँग्रेसचे तीन आमदार विजयी झाले होते.