मनोज जरांगे ऍक्टिव मोडमध्ये : राज्यभर का करताहेत दौरा ?

मनोज जरांगे ऍक्टिव मोडमध्ये : राज्यभर का करताहेत दौरा ?

– ११ जिल्ह्यात जाऊन साधणार संवाद

प्रतिनिधी
मराठवाडा : मराठा समाजाला कुणबी जातीचे‎ प्रमाणपत्र व आरक्षण मिळण्यासाठी‎ लढा देत असलेले मनोज जरांगे ‎पाटील आज शनिवारपासून ‎राज्याचा दौरा करणार आहेत. ३० ‎सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या १२‎ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात ११‎जिल्ह्यांतील ८७ गावांमध्ये जाऊन‎ जरांगे पाटील मराठा समाजाशी‎ संवाद साधतील. ५ हजार किमीहून‎ अधिक प्रवास ते करणार आहेत. या‎वेळी त्यांच्यासाेबत कायम २००‎ कार्यकर्ते व २५ वाहनांचा ताफा ‎असेल. प्रत्येक जिल्ह्यात वाहने व ‎कार्यकर्त्यांची संख्या वाढेल, अशी‎ माहिती छावाचे अध्यक्ष गंगाधर‎ काळकुटे यांनी दिली.‎

सरकारने मागितलेली वेळ १४‎ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या‎दिवशी आंतरवाली येथे १००‎ एकरांवर भव्य मेळावा घेतला‎ जाईल. त्यासाठी आज‎ शनिवारपासून ११ ऑक्टोबरपर्यंत हा‎ दौरा होणार आहे. जालना, हिंगोली,‎नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड,‎लातूर, धाराशिव, सोलापूर,‎अहमदनगर या १० जिल्ह्यांत हा‎ पहिला टप्पा होणार आहे. १४ ते २३‎ऑक्टोबर या दरम्यान दुसरा टप्पा‎ होईल. २४ ऑक्टोबर ही आरक्षण ‎देण्याची अंतिम मुदत असून ‎त्यानंतर भूमिका ठरवू, असे जरांगे‎ म्हणाले. ३० सप्टेंबर रोजी‎ पहिल्या दिवशी आंतरवाली सराटी,‎अंबड, घनसावंगी, कुंभार‎पिंपळगाव, परतूर, मंठा, जिंतूर, ‎हिंगोली या गावातून जरांगे दौरा‎ करणार आहेत.