या महिला आमदाराने आपल्याच सरकारला घेरले : हे ठरले कारण?

-म्हणाल्या, सरकार कोणाचेही असो

प्रतिनिधी
मुंबई: सत्ताधारी महायुतीचा एक घटक पक्ष शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदाराने आज एक खरा सवाल विधान परिषदेत विचारला काय आहे हा प्रश्न? सरकार कोणाचेही असो. सरकारच्या योजना शेवटपर्यंत पोहचतात का, असा सवाल शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदार भावना गवळी यांनी विधानपरिषदेत विचारला. राज्यातील शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांना मदत करा, आम्हाला सभागृहात बोलायची वेळ पडू नये,अशा प्रश्नांची सरबत्ती गवळी यांनी विधान परिषदेत नियम २६० अन्वेय बोलताना केली.

सरकारने केलेल्या कर्जमाफीवर विधान परिषदेत अनेक सदस्यांनी चर्चा केली. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी आहे की बँकासाठी असा सवाल काँग्रसेच्या सतेज पाटील यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर मतभेद विसरुन निर्णय घ्यायला हवे असे पाटील यांनी सांगितले. शेतकरी, विद्यार्थी, आणि बेरोजगारांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे अशी अपेक्षा अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेवर निधी मिळत नाही. अनेक विकास कामे रखडली असल्याची बाब अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजय घोडके यांनी निर्देशनास आणून दिली.

दिव्यांग, शेतकरी आणि कष्टकरांच्या समस्या अडचणी सभागृहात मांडल्या जात असून सरकारने त्याची दखल घ्यावी असे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकरी बळीराजा अनेक संकटांचा सामना करीत आहे. कर्जमाफी ते हमीभाव देऊन सरकारने त्यांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक हजारो गावांना दिलासा मिळाला आहे असे चित्रा वाघ यांनी सांगितले. सदाभाऊ खोत यांनी राज्यात लावण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटर उपक्रमाचे स्वागत केले.