संघाची भूमिका स्पष्ट; हिंदू राष्ट्रासाठी हे करणार

संघाची भूमिका स्पष्ट; हिंदू राष्ट्रासाठी हे करणार
-सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले

प्रतिनिधी
नागपूर : “हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे, आणि हे सत्य आहे. आरएसएस हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात आणणार आहे. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत. काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.

नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.संघ हिंदू राष्ट्राची निर्मिती नक्कीच करेल, अशी हिंदू समाजाची भावना असल्याचे भागवत म्हणाले. “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे, आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही पण सर्व भारतीयांची काळजी करा, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनमत तयार करण्यात मीडियाची मोठी भूमिका आहे.