शिंदे व भाजप सरकारला महाराष्ट्रातील इतक्या लोकांची पसंती
– विरोधक म्हणतात, खोटे सर्व्हेच आरोप
प्रतिनिधी
मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली राज्यातील विविध दैनिकांमध्ये शिंदेसेनेकडून जाहीरात करण्यात आली आहे. या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर विरोधकांकडून याचा जोरदार समाचार घेतला जात आहे. खोटे सर्व्हेकडून मुख्यमंत्री शिंदे राज्यात प्रतीमा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतू 2024 मध्ये खरे काय दिसेल, एकप्रकारे धुळफेक करण्याचे काम शिंदेसेना करत असल्याची तिखट प्रतिक्रिया विरोधकांकडून केल्या जात आहे.
एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली. तर त्याच्या खालोखाल देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले. शिंदेंना महाराष्ट्रात 26.1 तर फडणवीस – 23.2 यांना पसंती देण्यात आली.
-ही तर खोटी जाहीरात
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या जाहीरातबाजीला जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, ही जाहीरात खोटी आहे, जनतेच्या मनात धूळफेक करणारी आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना त्यांची जागा समजेल.
-एक होते शिंदे असे म्हणण्याची वेळ
कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ‘गुण नाही पण वाण लागला, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला’ अशी म्हणण्याची वेळ आहे. नुकताच एका दैनिकाचा सर्वे आला. यात शिंदे सेनेला केवळ पाच टक्के मिळतील असे म्हटले होते. त्यावेळी पुन्हा एकदा खोटे सर्व्हे करून जाहीरात बाजी करण्याचे काम शिंदे करत आहेत. परंतू 2024 नंतर एक होते शिंदे असे म्हणण्याची वेळ येईल, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते लोंढे यांनी केली.
विधानपरिषदेच्या उपसभापती तथा ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील जाहिरातबाजीवर टीका केली, सर्व्हेक्षण येत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सर्व्हे खोटा आहे, यातून खोटा दावा केला जात आहे.
-रोहित पवार म्हणतात
शिंदे गटाचे नेते स्वतःला प्रमोट करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे शिंदे फडणवीस यांच्यात वाद सुरू आहे. त्या वादाला मागे टाकण्याचे काम म्हणून त्यामुळे हे प्रमोशन सुरू आहे. अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केले.


