‘मन की बात’ ; पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद

‘मन की बात’ ; पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद
-100 वा भाग पूर्ण

प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाने रविवारी (३० एप्रिल ) 100 वा भाग पूर्ण केला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रमासाठी आज देशभर प्रदर्शनासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी समाजासर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काही खास व्यक्तिंशी संवाद साधला. संबंधितांनीही त्यांच्या कामाची माहिती देत पुढील वाटचाल कशी असेल याबाबत देशाला माहिती दिली. यात प्रदीप सांगवान, सुनील जगलान आणि मंजूर अहमद यांचा समावेश होता. तसेच त्यांच्या कार्याने संपूर्ण देशवाशियांना प्रेरणा मिळाली असेल, अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रदीप सांगवान हे हीलिंग हिमालय फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी हिमालयातील कचरा साफ करण्याचे कठीण काम हाती घेतले आहे. हिमालयातील निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सांगवान आणि त्यांची टीम हिमालयात खडतर प्रवास करतात. हिमालयातील कचरा जमा करून आणतात. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सांगवान यांना काही प्रश्न विचारून माहिती घेतली. पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्यासोबत हिमालयाचे आरोग्य जपणारे प्रदीप आहेत. आजकाल तुमची मोहीम कशी चालली आहे? त्यावर सांगवान यांनी त्यांच्या कामाची माहिती दिली.

प्रदीप सांगवान म्हणाले, “आम्ही 2020 नंतर पहिल्या पाच वर्षांत जेवढे काम करायचो ते आता केवळ एका वर्षात केले आहे. आम्ही आधी संघर्ष करत होतो. लोक साथ देत नव्हते. मात्र मन की बातमध्ये या कामाचा उल्लेख झाल्यावर चित्र बदलेले आहे. सध्या आम्ही दररोज पाच टन कचरा गोळा करतो. दरम्यान, खचलो होतो, मात्र तुमच्या मदतीने जोमाने कास करत आहोत.”