पंतप्रधानांचा जगाला इशारा: भारत-युक्रेन युद्ध थांबावावे लागेल

पंतप्रधानांचा जगाला इशारा: भारत-युक्रेन युद्ध थांबावावे लागेल

-शिखर परिषदेला सुरुवात

प्रतिनिधी

इंडोनेशिया : इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर संमेलनाच्या मंचावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धादरम्यान दोन देशांमध्ये विभागलेल्या जगाला मोठा इशारा दिला. जागतिक व्यासपीठावर पहिल्यांदाच जमलेल्या रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींसमोर पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनला युद्धाबाबत मी वारंवार सांगत आलो आहे की, युद्धविराम घेऊन शांततेच्या मार्गावर परतण्याचा मार्ग शोधावा लागेल. ते म्हणाले की, या युद्धामुळे ऊर्जा, खत आणि अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. आज खत उपलब्ध झाले नाही, तर उद्या जगाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासेल, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.

पीएम मोदी म्हणाले, ‘दुसऱ्या महायुद्धाने जगात हाहाकार माजवला होता. यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आता आपली पाळी आहे. कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. शांतता, सुरक्षा आणि बंधुता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित आणि सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. भगवान बुद्ध आणि गांधीजींच्या पवित्र भूमीवर जी-20 ची बैठक होईल तेव्हा आपण जगाला शांततेचा ठोस संदेश देऊ, अशी मला खात्री आहे.