कारण काय ? काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील निलंबित
-अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत कारवाई
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी राज्यसभेत भाषण सुरू असताना विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्याचा मोबाइलवर व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील (बीड) यांना सभापती जगदीप धनखड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत निलंबित केले.संसदीय कामकाज मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी हा मुद्दा मांडला होता.
दरम्यान, रजनी पाटील म्हणाल्या, ‘मी स्वातंत्र्यसैनिकाच्या घरातून आलेय. कायदा उल्लंघनाचे संस्कार माझ्यावर नाहीत. अशी ‘फाशीची शिक्षा’ देण्यासारखे मी काहीही केले नव्हते. मोदींनी काल सभागृहात ज्या पद्धतीने अवमानकारक भाषण केले ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही वारंवार रोखल्याने ते घाबरले आहेत.’


