काय बोलता ? या अभिनेत्रीचे पाकिस्तानच्या बँकेत खाते
-थेट पत्रपरिषदेत दिला पुरावा
प्रतिनिधी
अहमदनगर : अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
अहमदनगरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पाकिस्तानच्या बँकेत दीपाली सय्यद यांचे बँक खाते असल्याचा पुरावा त्यांनी दिला आहे. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना हे सर्व माहिती असून केवळ आर्थिक हितसंबंधामुळे त्यांना पाठीशी घातले जाते असा आरोप शिंदे यांनी केला आहे. यापुढे दीपाली सय्यद यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
-काय आहे आरोप ?
-दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
-सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दीपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दीपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
-यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
-भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
-दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.


