काँग्रेस तयार ! काँग्रेस अल्प राज्यात विरोधकांशी हातमिळवणी

काँग्रेस तयार ! काँग्रेस अल्प राज्यात विरोधकांशी हातमिळवणी

-पक्षाच्या सुकाणू समितीचे शिक्कामोर्तब

प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुका व पुढील सार्वत्रिक निवडणुकीवरून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यावर पक्षात तत्त्वत: सहमती दर्शवण्यात आली. आता पक्षाच्या सुकाणू समितीवर शिक्कामोर्तब होईल. पक्षाने याची माहिती विरोधी पक्षांना एकजूट करणाऱ्या मित्र पक्षांनाही दिली आहे. या क्रमवारीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात १२ जून रोजी सर्व स्थिती क्लिअर होईल.

भाजपला २०२४ मध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही राज्यांत प्रादेशिक पक्षांशी युती शक्य नाही. विरोधकांचे व्यासपीठ शेअर करण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र, निवडणुकीत तडजोड अशक्य आहे. यात आंध्रातील वायएसआरसी, टीडीपी, ओडिशा बिजद, तेलंगण बीआरएस, बंगाल तृणमूलचा समावेश आहे.

-आप’सोबत युती करण्याबाबत संभ्रम

पंजाब-दिल्लीत ‘आप’सोबत युती करण्याबाबत काँग्रेसमध्ये अधिक संभ्रम आहे. काँग्रेस या राज्यांत प्रादेशिक पक्षांना संधी देऊ इच्छित नाही. यंदा पंजाबमध्ये ‘आप’ने विधानसभा निवडणूक जिंकली. तथापि, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला ४०.१% व आपला ७.४% मते मिळाली होती. तर दिल्लीत भाजपने सर्व ७ जागा जिंकल्या होत्या.