कसबा, चिंचवडमध्ये भाजपाच्या मदतीला धावली मनसे
-राज ठाकरेंच्या सर्व प्लॅनिंगचं गुपित
प्रतिनिधी
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणुकीच्या कोणत्याही जागेवर मनसे उमेदवार देत नाही, ही पक्षाची प्रथा आहे. त्यानुसार कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार न देता भाजपच्या समर्थनार्थ आपली ताकद उभी करण्याचा निर्धार मनसेने केला आहे. राज ठाकरेंच्या सर्व प्लॅनिंगचं गुपित मनसे नेते बाबू वागसकर यांनी फोडलं आहे. आज खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाच्या कारणास्तव प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता राज ठाकरेंचे ‘सैनिक’ भाजपच्या मदतीला धावून जाणार असल्याने उमेदवार हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली असेल.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राज ठाकरे यासंदर्भात मौन बाळगून होते. कसबा आणि चिंचवडमध्ये राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार? मनसेची काय भूमिका असणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. पोटनिवडणूक जसजशी जवळ येत होती, तसतशी मनसेच्या भूमिकेविषयची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत होती. अगदी वेळेवर मनसैनिक ‘कामाला’ लावण्याचा राज ठाकरेंचा प्लॅन होता. पण मनसे नेते बाबू वागसकर यांनी त्याआधीच राज ठाकरेंचं गुपित फोडले आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली आहे. गेल्या सात महिन्यात राज ठाकरे आणि शिंदे फडणवीसांच्या अनेक गाठीभेटी झाल्या आहेत. राज्यातल्या विविध मुद्द्यांवरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्र लिहिली आहेत. राज्यकर्त्यांनीही राज ठाकरेंच्या पत्रांची दखल घेत त्यांना निर्णयरुपी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबतची केमिस्ट्री वेळोवेळी चर्चेत आली आहे. दुसरीकडे तोंडावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखीलभाजप-शिंदे गटाच्या साथीने मनसे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या तिन्ही पक्षांचं सध्या उत्तम सूत जुळत असल्याने राज ठाकरेंनी पोटनिवडणुकीत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.