ऑडिट करू, का होतात नागपुरातून उद्योग गायब?

ऑडिट करू, का होतात नागपुरातून उद्योग गायब?

-टाटा समुहाचे गडकरी यांना पत्र

प्रतिनिधी

नागपूर : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहे. टाटा समूहाने नागपूरच्या मिहान सेझमध्ये उत्सुकता दर्शवली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने मिहानचे ही मूल्यमापन करू, असे आश्वासन टाटा समूहाने दिले.

टाटा समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष  नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे त्याकडे लक्ष वेधले होते. मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनाॅमिक डेव्हलपमेंट काऊंसिल अर्थात वेदने एक आराखडा तयार केला आहे. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी टाटा समूहाला पाठवलेल्या पत्रात केला होता. उद्योग विस्तारासंदर्भात वेदच्या संपर्कात राहू असे टाटा समूहाने गडकरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.