हे काय बोलले : शिंदे गट हा भाजपच्या पोटातील ॲपेंडिक्स

हे काय बोलले : शिंदे गट हा भाजपच्या पोटातील ॲपेंडिक्स

-शिंदेसेनेकडून टोकाची टीका

प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. मात्र यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेना वि. शिवसेना असा कलगीतुरा रंगला असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. शिवेसाना उबाठा ही काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असा खोचक टोला म्हस्के यांनी लगावला.

महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी आज सकाळी शिवसेना शिंदे गटावर आरोप केले, ते आम्हाला ॲपेंडिक्स म्हणाले, ते तर पोटात असतं. पण आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध म्हणजे शिवसेना ठाकरे गट आहे.काँग्रेसच्या झाडावरती संजय राऊत हे बांडगुळाची भूमिका करत आहेत. आज राहुल गांधींची दुपारी पत्रकार परिषद आहे, याची माहिती संजय राऊत हे पत्रकारांना देत होते. किती वाईट अवस्था झालेली आहे, राऊत यांना शिपायाचं काम करावं लागत आहे, अशा शब्दांत म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली.