सत्ताधारी म्हणतात, युवासेना पदाधिकाऱ्यांचे थेट दाऊदशी संबंध!

सत्ताधारी म्हणतात, युवासेना पदाधिकाऱ्यांचे थेट दाऊदशी संबंध!

-विधानभवनाच्या पायऱ्यावर कारवाईसाठी आंदोलन

प्रतिनिधी
नागपूर : खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत ४४ काल करणारा ‘एयू’ कोण? असा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली.

दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी शेवाळे यांनी पत्रपरिषद घेत त्या महिलेचे दाऊद व युवासेनेशी ‘कनेक्शन’ असल्याचे म्हटले होते. यामागील खुलासा करावा या मागणीसाठी शिंदे गट व भाजप आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दाऊदशी संबंधित महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.