शहा मुंबईत : कुणाला दिली तंबी, कुणाचे टोचले कान

शहा मुंबईत : कुणाला दिली तंबी, कुणाचे टोचले कान

-विनोद तावडे यांच्या घरी सांत्वनपर भेट

प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आज आणि उद्या नियोजित आहे. सह्याद्री अथितीगृहावर अमित शाह यांचा राज्यातील भाजप नेत्यासोबत बैठक पार पडणार आहे. तसेच, महाराष्ट्र भूषण वितरण सोहळ्याला देखील अमित शाह उपस्थित राहणार आहेत, असे असले तरी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शाह यांच्या दौऱ्यावर पाहिले जाते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहे. त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी जात त्यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी तावडे यांच्या आईचे निधन झाले आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. ज्या गाडीतून ते विमानतळावरून बाहेर पडले त्या गाडीच्या मागील सीटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार बसल्याचे दिसून आल्याने मुंबई मनपासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने अमित शहांची नाराजी अजून कायम असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा आले आहेत. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. मात्र या दौऱ्याच्या पाठिमागे राजकीय पार्श्वभूमी देखील आहे.

‘बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिकांचा सहभाग नव्हता,’ असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले तर आमदार आशिष शेलार यांनीही ‘चंद्रकांत पाटील यांनी तसे बोलायला नको होते’ असे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशी तंबी त्यांना अमित शहांकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सायंकाळी 7 वाजता त्यांचे विमानाने आगमन होईल. साडेसात पासून रात्री उिशरापर्यंत ते सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. रविवारी सकाळी राजभवनमधून हेलिकॉप्टरने अमित शहा नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क येथे पोचतील. सकाळी साडेदहा वाजता तेथे अप्पासाहेबांना त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल. यानंतर शहा गोव्याला रवाना होतील.

पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 17 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अमित शहांनी कोल्हापूरला देखील भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.