शरद पवारांची विदर्भातील या नेत्याबाबत चूक झाली
-रोहित पवार यांचे वक्तव्य
प्रतिनिधी
जळगाव : शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती. तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिले होते. मुख्यमंत्रीपद मिळाले नसले तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती, असे म्हणत रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल सांगत आहेत. प्रफुल्ल पटेल भविष्याचे पुस्तक लिहिणार आहेत, त्या पुस्तकात त्यांनी शरद पवार यांनी विश्वास टाकल्यामुळे पार्टीचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झाले, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहावे.
–संसदेच्या माध्यमातून मार्गी लावा
आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आता या विषयावर राजकारण न करता हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक तसेच ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी शरद पवार यांनी सर्वांना संधी दिली. 2014 मध्ये शरद पवार यांनी कुणबी समाजासाठी घेतलेला निर्णय हा सुद्धा महत्वपूर्ण ठरला. आरक्षणाचा विषय हा संसदेच्या माध्यमातून मार्गी लावता येईल, भाजपने गायकवाड आयोग नेमला, मात्र अधिवेशनात चर्चा कुठलीही केली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकीय दृष्टिकोनातून बावनकुळे जर आज काहीही बोलले तर त्यांना उत्तर हे आपले शरद पवारच देतील.
-भाजप दहशतीत
आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी मग इतर पक्ष का लागत आहे. लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे, आणि लोकांना ही नकोसे झाल्यामुळे हे भाजपला समजल्यामुळे भाजप घाबरले आहे. इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सततच्या बैठकांमुळे भाजप दहशतीत आहे. तत्पूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील बैठक चांगली झाली. पाच समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजप घाबरला आहे. त्यामुळे केंद्र सरकार विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचे ते म्हणाले.


