या राज्यात राबविला जाईल महाराष्ट्र निवडणूक पॅटर्न

या राज्यात राबविला जाईल महाराष्ट्र निवडणूक पॅटर्न

-संघाने कंबर कसल्याची माहिती

प्रतिनिधी
प. बंगाल : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपाने या निवडणुकीत १४९ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते, त्यापैकी तब्बल १३२ जागांवर त्यांना दणदणीत विजय मिळाला. महायुतीला मिळालेल्या या प्रचंड श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं जात असलं तरी पडद्यामागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार पाडलेली भूमिकाही तितकीच महत्वाची ठरल्याचं सांगितलं जातं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाचे भाजपाच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. आता महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजपाला मदत करण्यासाठी संघाने तशीच रणनीती आखल्याचं दिसून येत आहे.

पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी हिंदू मतदारांची मोट बांधण्यासाठी भाजपाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. बंगालमधील हिंदू मतदारांचा भाजपासह तृणमूल काँग्रेसलाही मोठा पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रत्येक शहरात “हिंदू संमेलन” आयोजित केले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतांमध्ये फूट पडू द्यायची नाही, असं आवाहन संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी केलं होतं. त्यांच्या या आव्हानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ नारा दिला. पुढच्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी एक घोषणा दिली. याच घोषणांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊन महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेले हे अभियान संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांचा भाग म्हणून राबविले जाणार आहे, ज्याची सुरुवात दुर्गापूजेनंतर होणार आहे. मात्र, हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, राज्यातील तळागाळात हिंदूमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यापक सामाजिक प्रयत्न असेन, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बंगालमधील हिंदू मतांचे विभाजन
२०११ च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालची लोकसंख्या सुमारे ९.१३ कोटी होती, त्यापैकी सुमारे ७०.५% लोक हे हिंदू समुदायातील आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसलाही बऱ्याच हिंदू मतदारांनी पाठिंबा दिलेला आहे.

२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकूण ३८.१% मते मिळाली होती.
लोकनिती-सीएसडीएसच्या अभ्यासानुसार, या निवडणुकीत भाजपाला जवळपास ५० टक्के हिंदू मतदारांनी पाठिंबा दिला होता.
विशेष बाब म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही बंगालमधील ५७% हिंदू मतदारांनी भाजपालाच समर्थन दिले होते. तरीही विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचाच विजय झाला.
उत्तर प्रदेश आणि आसाममधील विभाजित हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यास भाजपाला याआधी यश मिळालं आहे.
पश्चिम बंगालमध्ये मात्र भाजपाला हिंदू मतदारांची मोट बांधण्यात काहीसं अपयश आलेलं आहे,अजूनही बरेच हिंदू मतदार हे तृणमूल काँग्रेसच्याच पाठिशी असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेले हे अभियान संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांचा भाग म्हणून राबविले जाणार आहे, ज्याची सुरुवात दुर्गापूजेनंतर होणार आहे. मात्र, हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, राज्यातील तळागाळात हिंदूमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यापक सामाजिक प्रयत्न असेन, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.

पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेले हे अभियान संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांचा भाग म्हणून राबविले जाणार आहे, ज्याची सुरुवात दुर्गापूजेनंतर होणार आहे. मात्र, हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, राज्यातील तळागाळात हिंदूमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यापक सामाजिक प्रयत्न असेन, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.