या राज्याच्या गृहमंत्र्यांना खड्ड्यासाठी थेट लिहावे लागले सीएमला पत्र
-रामगड ते डेराबस्सी रस्ता चौपदरीची मागणी
प्रतिनिधी
पंजाब : हरियाणाचे दबंग गृहमंत्री अनिल विज गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील एका रस्त्यामुळे त्रस्त आहेत. त्यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहावे लागले.
ज्यामध्ये त्यांनी सीएम भगवंत मान नक्कीच माझी मागणी मान्य करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. खरे तर गृहमंत्री विज पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील झिरकपूर रस्त्याने त्रस्त आहेत. रामगड ते डेराबस्सी हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना केली. या मार्गावर कायमच वाहतूकीचा खोळंबा होतो.
विज यांनी पत्रात लिहिले आहे की, डेरा बस्सी ते रामगढ हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. ज्या लोकांना डेराबस्सी मार्गे चंदीगड किंवा पंचकुलाला जावे लागते. ते रामगडमार्गे या रस्त्याने पंचकुला, चंदीगडला पोहोचतात. या मार्गावर विशेषतः जिरकपूरमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी असते. हा रस्ता अरुंद व तुटलेला असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.
डेरा बस्सी ते रामगढ मार्गे चंदीगड-पंचकुला असा प्रवास करणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेण्याची मागणी गृहमंत्री अनिल विज यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे केली. हा रस्ता चौपदरी करा. त्यामुळे चंदीगड आणि पंचकुला येथे जाण्यासाठी सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही.


