या नेत्याला पत्रातून ठार मारण्याची धमकी

या नेत्याला पत्रातून ठार मारण्याची धमकी

-वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार

प्रतिनिधी
मुंबई : आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी एका निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. हे पत्र मराठीतून आले आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे, अशी माहीती आशिष शेलार यांच्या खासगी सचिवामार्फत कळवण्यात आले आहे.

आशिष शेलार यांना पाठवण्यात आलेले पत्र मराठीतून आहे व ते एकपानी आहे. वांद्रा पोलिस ठाण्यात एफआयआर झाला असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पत्र पाठवून धमकी देणाऱ्याचा शोध तसेच या प्रकरणी तपास पोलिस करीत आहेत.

पत्रातून धमकी दिली गेली की, तुम्ही जास्त बोलतात. तुमचे कापून तुकडे करू. हे पत्र निनावी पत्र पाठवले आहे. हे पत्र आशिष शेलार यांच्यापर्यंत पोहचले असून त्यानंतर शेलार यांच्यामार्फत पोलीस स्टेशनमध्ये यात कार्यवाही केली गेली.

निनावी पत्रात राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारविरोधातही मजकूर लिहीला गेल्याचे समोर आले आहे. यात उपमुख्यमंत्र्यांबद्दलही अपशब्द असल्याचे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिस करीत आहेत.

यापूर्वीही भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन धमकी देण्यात आली होती. हा प्रकार साधारणतः एक वर्षांपूर्वीचा होता.