म्हणे, यांनी बाबरी मशीद पाडली, शिवसैनिकांनी नाही

म्हणे, यांनी बाबरी मशीद पाडली, शिवसैनिकांनी नाही

– या नेत्याचा परत दावा

प्रतिनिधी
मुंबई : बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजपचे चंद्रकांत पाटील करतात. त्यावर उद्धव ठाकरेही लगेच पेटून उठतात. बाबरी पाडण्यात शिवसेनेचा कसा हात होता, हे अगदी छाती ठोकून सांगतात. नंतर चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य फिरवून सारवासारव केली आणि आपल्या म्हणण्याचा विपर्यास वगैरे झाल्याचे देखील म्हटले, पण विषय येथे संपलेला नाहीच. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता.

6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का? अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठिशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते. संजय संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तर होते का?, असा सवालही त्यांनी केला. बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावाही त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.

राजकारणात सर्वच विधाने अनावधानाने केली जात नाहीत. कट्टर धार्मिकतेकडून चक्क धर्मनिरपेक्षतेकडे झुकणाऱ्या ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी अगदी ठरवून आणि जाणून-बुजून हे विधान करण्यात आल्याचे समजते. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. ते म्हणाले,मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. हा विषय गंभीर आहे. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली, तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते.