मोठ्या हालचाली : मराठा आरक्षणासाठी दिल्लीत वेग
-शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट
प्रतिनिधी
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अधिक तीव्र होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच आता राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलाय. संभाजीराजे छत्रपती राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. दहा दिवसांआधी संभाजीरीजेंनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. आता ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.


