मोठा दावा : प्रकाश आंबेडकर म्हणतात, दिवाळीनंतर अल्पसंख्याकवर हल्ले

मोठा दावा : प्रकाश आंबेडकर म्हणतात, दिवाळीनंतर अल्पसंख्याकवर हल्ले

-कार्यक्रम, सभा, मिरवणुकांचे आयोजन

प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : देशातील राजकारण धर्म आणि जातीवर‎ अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.‎‎त्यामुळे येत्या‎‎ निवडणुकांच्या ‎‎पार्श्वभूमीवर देशात‎‎ अराजकता माजेल, असा‎‎ दावा भाजपचे नाव न घेता‎‎ वंचित बहुजन आघाडीचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला‎ आहे.‎

सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,‎देशात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात‎ झाली आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन‎ आघाडीतर्फे शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी,‎उद्याेग व्यापार, महागाई विषयांवर विविध ‎कार्यक्रम, सभा, मिरवणुकांचे आयोजन ‎करण्यात आले आहे. लोकसभेला सर्व पक्ष‎जर स्वतंत्र लढले, तर महाराष्ट्रातील सर्व ४८‎जागा आम्ही लढवू.

यासाठी सक्षम‎ उमेदवारांची निवडही केली आहे. महाराष्ट्रात ‎अनेक एमआयडीसी उभ्या राहिल्या आहेत.‎परंतु, त्यात स्थानिकांना प्राधान्य दिले जात‎नाही. शेतकरी नेते शेतकऱ्यांच्या हिताबाबत ‎बोलण्यापेक्षा व्यापाऱ्यांचे नेते झाले आहेत. ‎त्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर परिस्थितीचा ‎सामना करावा लागत आहे. राज्याच्या ‎तिजोरीत साडेपाच लाख कोटी रुपये येतात. ‎परंतु, त्याचे योग्य नियोजन केले जात नाही.‎सनातनी डोक्याचे काही लोक ज्याप्रमाणे भाष्य‎ करीत आहेत ते देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे‎ येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात‎ अराजकता माजेल. मुस्लिम, खिश्चन आणि ‎जैनांवर हल्ले केले जातील. त्यामुळे‎ मतदानापर्यंत लोकांनी शांतता राखावी.‎ कॅनडाच्या प्रश्नावर मोदींची ५६ इंचाची छाती‎ आता २४ इंचाची झाली आहे. येत्या‎ निवडणुकांपर्यंत ती २० इंचापर्यंत येईल असेही‎ते म्हणाले.